उमरगा -लोहारा तालुका काँग्रेस समितीच्या वतीने इंधन दरवाढ आणि महागाईच्या निषेधार्थ शुक्रवारी राष्ट्रीय महामार्गावर काँग्रेस समिती कार्यालयासमोर प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.